चांदीच्या हातोड्यानं तोडली सोन्याची अंगठी!

पोप पदावरून राजीनामा देणारे बनेडिक्ट (सोळावे) यांची सोन्याची अंगठी तोडण्यात आलीय. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ही अंगठी चांदीच्या हातोड्यानं तोडण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2013, 02:54 PM IST

www.24taas.com, व्हॅटिकन सिटी
पोप पदावरून राजीनामा देणारे बेनेडिक्ट (सोळावे) यांची सोन्याची अंगठी तोडण्यात आलीय. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ही अंगठी चांदीच्या हातोड्यानं तोडण्यात आलीय.
पोप पदावरील व्यक्तीच्या हातातील सोन्याची अंगठी ही पोप पदाच्या शक्तीचं आणि पोप पदावरील व्यक्तीला मान्यता देण्याचं एक प्रतिक म्हणून ओळखली जाते.
बेनेडिक्ट यांनी पोप पदावरून राजीनामा दिल्यानंतर नवीन पोप निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. याचवेळी पदभारातून मुक्त झालेल्या बेनेडिक्ट यांच्या हातातील ‘फिशरमॅन्स’ म्हणून ओळखली जाणारी सोन्याची अंगठी एका विशिष्ठ चांदीच्या हातोड्यानं तोडण्यात आलीय. त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याचं हे प्रतिक आहे.

ही अंगठी बनविणाऱ्या सुनार क्लॉडियो फैरंची यांनी, पोप पदावरील व्यक्तीनं त्याग केल्यानंतर ही अंगठी नष्ट केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. ही अंगठी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येईल, प्रतिकात्मक रुपात या अंगठीचं मूल्य मोजण्यात येतं.