एअर होस्टेसच्या तोंडावर त्यांनी फेकले गरम नुडल्स

थाई एअर आशियाच्या या चित्रांनी सोशल मीडियामध्ये एक वेगळाच हंगामा केला आहे. बॅंकॉक मधून चीनला जाणाऱ्या या विमानात काही असं घडलं की लोकं नुसती बघतच राहिली.

Updated: Dec 16, 2014, 07:08 PM IST
एअर होस्टेसच्या तोंडावर त्यांनी फेकले गरम नुडल्स title=

नवी दिल्ली : थाई एअर आशियाच्या या चित्रांनी सोशल मीडियामध्ये एक वेगळाच हंगामा केला आहे. बॅंकॉक मधून चीनला जाणाऱ्या या विमानात काही असं घडलं की लोकं नुसती बघतच राहिली.
डेली मेलनुसार एका महिलेला खूप राग आला जेव्हा तिला कळलं की तिची सीट ही तिच्या बॉयफ्रेंडच्या सीटपासून लांब आहे. त्या महिलेला यावर इतका राग आला की तिने रागाच्या भरात तेथे उभ्या असणाऱ्या एअर होस्टेसच्या तोंडावर गरमागरम नुडल्स आणि पाणी फेकले.
ह्या सगळ्या प्रकारानंतर कोणालाही वाटेल की हे दोघेही माथेफिरू आहेत. तसेच या प्रकारानंतर त्या महिलेच्या बॉयफ्रेंडनी त्या एअर होस्टेसला विमान उडवून टाकेन अशी धमकी देखील दिली.
हे सगळं होत असताना बाकीच्या लोकांनी मात्र त्याचा आनंद घेतला. या सगळ्या प्रकाराचे ते फोटो आणि व्हिडिओ काढण्यात गुंग झाले. जेव्हा ती एअर होस्टेस जोरजोराने ओरडू लागली तेव्हा फ्लाइटमधील सारे क्रु मेंबर्स तेथे पोहचले. त्यानंतर त्यांनी तिला तेथून बाहेर काढले व ती त्यांच्यापासून बचावली गेली.
यानंतर ते विमान थांबवून त्या माथेफिरूंना बाहेर काढण्यात आले. या सगळ्यात बाकी प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.