सुषमा स्वराजांनी अमेरिकेकडे मागितली २७१ प्रवाशांची संपूर्ण माहिती

भारत सरकारने अमेरिकेकडे त्या २७१ अनधिकृत स्थलांतरीत लोकांच्या प्रकरणांची माहिती मागवली आहे ज्यांना ते दिल्लीला पुन्हा पाठवू इच्छिता. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेला हा संदेश पाठवला आहे.

Updated: Mar 25, 2017, 12:21 PM IST
सुषमा स्वराजांनी अमेरिकेकडे मागितली २७१ प्रवाशांची संपूर्ण माहिती title=

नवी दिल्ली : भारत सरकारने अमेरिकेकडे त्या २७१ अनधिकृत स्थलांतरीत लोकांच्या प्रकरणांची माहिती मागवली आहे ज्यांना ते दिल्लीला पुन्हा पाठवू इच्छिता. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेला हा संदेश पाठवला आहे.

पराराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी म्हटलं की, या प्रकरणात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने म्हटलं होतं की ते लवकरच आकडे आणि माहिती पुरवतील पण २७१ लोकांची अजून कोणतीही माहिती दिली गेलेली नाही."

न्यूज एजेंसीच्या बातमीनुसार परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, "आम्हाला त्या २७१ लोकांची फक्त लिस्ट मान्य नाही. आम्हाला त्यांची पूर्ण माहिती हवी आहे. आम्ही त्याला तेव्हाच मान्य करु जेव्हा ती तपासली जाईल."

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अॅडमिनिस्ट्रेशनने २७१ लोकांची एक लिस्ट दिली आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे की ते अनधिकृतपणे स्थलांतरीत झाले आहेत आणि ते भारतीय आहेत.