दोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील  एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.

Updated: May 26, 2015, 07:54 PM IST
दोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील  एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.

मिलोव्हानोव्ह हिला दोन मुले असून त्यांमधील एकाचे वय पाच, तर दुसऱ्याचे वय सात आहे. 'जिहादी पत्नींची' भरती करणाऱ्या कुप्रसिद्ध झेहरा दुमानचा मिलोव्हानोव्हच्या फेसबुकवरील मित्र-मैत्रिणींच्या यादीमध्ये समावेश असल्याचे आढळून आले आहे. 

जिहादसाठी 'पत्नी'ची भरती करणाऱ्या गटाच्या प्रचारास मिलोव्हानोव्ह बळी पडल्याचे मानण्यात येत आहे. 

नवी गाडी घेण्याचे कारण सांगून सिडनी येथील घरामधून मिलोव्हानोव्ह बाहेर पडली.  यानंतर मिलोव्हानोव्ह परतलेली नाही. आपल्या याआधीच्या पतीला आपण सीरियामध्ये असल्याचा संदेश तिने पाठवला. 

या संदेशाने आपल्याला अत्यंत धक्का बसल्याचे तिच्या पतीने सांगितले. यानंतर मिलोव्हानोव्हशी कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.