वॉशिंग्टन : जर मला माफीचा साक्षीदार बनवला तर मी मुंबईतील २६/११च्या हल्ल्याची सर्व माहिती देईन, अशी कबुली डेव्हिड कोलमन हेडली यांने दिलेय.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत ही एक मोठी घडामोड मानली जात आहे. भारताच्या इतिहासांत पहिल्यांदा परदेशातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका आरोपीची साक्ष नोंदवण्यात आलीय. हा आरोपी आहे डेव्हिड कोलमन हेडली.
वॉशिंग्टन डीसी येथून २६/११ चा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली तथा दाऊद गिलानीची साक्ष झाली. यावेळी हेडलीनं आपले सर्व गुन्हे मान्य केलेत. जर मला माफीचा साक्षीदार बनवला, तर हल्ल्याची सर्व माहिती देईन, असंही तो ऑनलाईन साक्ष देताना म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.