जोहान्सबर्ग : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेतील एका काळ्या बाळाचे फोटो व्हायरल होतोय. या बाळाला पाहून कुणालाही भीती वाटेल. कारण या बाळाच्या डोळ्याभोवतीची त्वचाही काळी आहे. जी वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य बाब आहे.
हा फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. हा फोटो खरा आहे की, खोटा यावरही चर्चेला उधाण आलंय. काही लोकांच असं म्हणणं आहे की, दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारचे मुल असू शकते. तर काही लोकांनी या फोटोला एडिटेड फोटो म्हटलंय. लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी हा फोटो तयार केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय.
काय आहे या बाळाचं रहस्य?
फोटो व्हायरल करणाऱ्यांनी या बाळाला जगातील सर्वात काळं बाळ म्हटलंय. या बाळाचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झालाय. पण गिनीज बुकने केलेल्या तपासणीत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. या फोटोला अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या व्हायरल बनवताहेत हे ही जाणून घेणं आवश्यक आहे.
जगात सर्वात आधी १९८८ साली अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका पत्रकाराला आलेल्या मेलमध्ये काळ्या डोळ्यांच बाळ मिळाल्याची माहिती दिली होती. जे रोबोट सारखं चालत होतं.
हे बाळ एलियन?
आजपर्यंत अशा प्रकारचं बाळ पाहिलं नसल्याने हे बाळ एलियन असल्याच्याही चर्चा रंगू लागल्यात. हा फोटो ज्यापद्धतीने शेअर केला जातोय त्याची तुलना एलियन स्टोरीजशी केली जातेय. या बाळाबद्दलची भीती आणि उत्सुकता यामुळे याची लोकप्रियता वाढून जास्त चर्चा होऊ लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.