कर्नाटकमध्ये उभं राहतंय 'सीक्रेट अणु हत्यारांचं शहर', अमेरिकेला धास्ती

भारत 'थर्मो अणु हत्यारं' बनवण्यासाठी एक गोपनीय अणु (न्यूक्लिअर) शहर बनवत असल्याचं,  अमेरिकेच्या एका मॅगझीननं म्हटलंय. 

Updated: Dec 18, 2015, 06:26 PM IST
कर्नाटकमध्ये उभं राहतंय 'सीक्रेट अणु हत्यारांचं शहर', अमेरिकेला धास्ती title=

वॉशिंग्टन : भारत 'थर्मो अणु हत्यारं' बनवण्यासाठी एक गोपनीय अणु (न्यूक्लिअर) शहर बनवत असल्याचं,  अमेरिकेच्या एका मॅगझीननं म्हटलंय. 

अणु संशोधनात भारताची क्षमता यामुळे वाढणार असल्याचा दावा या मॅगझिननं केलाय. तसंच यामुळे, पाकिस्तान आणि चीनच्या चिंतेत वाढ होणार असल्याचंही यामध्ये म्हटलं गेलंय. 

'फॉरेन पॉलिसी मॅगझीन'नं केलेल्या आरोपानुसार, भारतानं कर्नाटकच्या चल्लकेरे या ठिकाणी या गोपनीय शहराचं निर्माण सुरू केलंय. २०१७ मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर हे ठिकाण म्हणजे आशिया खंडातलं सर्वात मोठं अणु सेंट्रीफ्युज, अणुसंशोधन प्रयोगशाळा आणि हत्यारं तसंच विमान परीक्षण प्रतिष्ठान असेल, असा दावा यात करण्यात आलाय. 

भारत सरकारचे सेवानिवृत्त अधिकारी आणि लंडन-वॉशिंग्टन स्थित स्वतंत्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताची आत्तापर्यंतची वादग्रस्त आणि अपूर्ण इच्छा म्हणजे भारतासाठी संवर्धित युरेनियम इंधनचा अतिरिक्त साठा करण्याची आहे. याच, युरेनियमला हायड्रोजन बॉम्ब किंवा थर्मो अणु हत्यारं बनवण्यासाठी वापरलं जातंय.