VIDEO : गर्भावस्थेत असताना दगा देणाऱ्या पतीला पत्नीनं असा शिकवला धडा

ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.

Updated: Dec 11, 2015, 12:55 PM IST

नवी दिल्ली : ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.

गर्भवती असलेल्या या महिलेनं पतीला जवळच्याच एका रेस्टोरन्टमध्ये आपल्या बाजुच्याच एका महिलेसोबत लन्च करताना पाहिलं. आपल्याला पती दगा देतोय हे लक्षात आल्यानंतर ही महिला इतकी चिडली की तिनं पतीच्या कारवर चढून त्याची कारच फोडून टाकली.

या व्हिडिओत ही महिला कारवर चढताना आणि जोरजोरात ओरडताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिनं संपूर्ण कारची तोडफोड करून टाकलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.