VIDEO : स्मार्टफोनमध्ये हरवलेल्यांनो इकडे लक्ष द्या...

तुमचा स्मार्टफोन तुमचा जीव कसा धोक्यात घालू शकतो, याचं उत्तम उदाहरण चीनमधल्या एका शहरात पाहायला मिळालंय. 

Updated: Sep 22, 2015, 01:54 PM IST
VIDEO : स्मार्टफोनमध्ये हरवलेल्यांनो इकडे लक्ष द्या... title=

मुंबई : तुमचा स्मार्टफोन तुमचा जीव कसा धोक्यात घालू शकतो, याचं उत्तम उदाहरण चीनमधल्या एका शहरात पाहायला मिळालंय. 

बसमध्ये बसलेली असताना स्मार्टफोनमध्ये गुंग असलेल्या एका महिलेला तीचा बसस्टॉप येऊन गेला, हे कळलंदेखील नाही. नंतर मात्र जेव्हा तिच्या हे लक्षात आलं, तेव्हा बस पुढे निघालेली होती.

मात्र, पुढच्या बसस्टॉपवर बस उभी राहण्याची वाट न पाहता या महिलेनं आपला जीवच पणाला लावला.

तिनं इकडे तिकडे पाहत बसची खिडकी उघडली आणि त्यातून बाहेर उडीही मारली... महत्त्वाचं म्हणजे, यावेळी बसच्या बाजुनं अनेक गाड्या आणि बाईक जात होत्या. पण, नशीब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचला... आणि ती निघून गेली. 

पण, या महिलेचा हा धांदरटपणा सीसीटीव्हीत कैद झाला... आणि हा व्हिडिओ आता वायरल होतोय. 

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.