वेन पार्नेलने पत्करली शरणागती

Last Updated: Thursday, April 11, 2013 - 15:49

www.24taas.com, मुंबई
दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू वेन पार्लेनने पोलिसांच्या तीन तास कसून चौकशीनंतर शरणागती पत्करली आहे. गेल्या वर्षी जुहू पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी रंगेहाथ पकडले होते.
गेल्या वर्षी ओकवूड हॉटेलात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत वेन पार्नेला पकडले होते. त्याचप्रकरणात सोमवारी पार्नेलने कोर्टासमोर शरणागती पत्करली. त्याबाबत त्याची पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करून १० हजार रूपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.

`ओकवूड` येथे झालेल्या रेव्ह पार्टीत ८६ जणांविरूद्घ पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र त्यातील ३५ जण परदेशी असून ते सर्व फरार आहेत.First Published: Thursday, April 11, 2013 - 15:49


comments powered by Disqus