नवी दिल्ली : इंग्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या कुत्र्याला घेऊन फेरफटका मारणाऱ्या एका व्यक्तीला एक बहुमूल्य वस्तू मिळालीय... ही बहुमूल्य वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून व्हेल माशानं केलेल्या उलटीचा तुकडा आहे.
या व्यक्तीला व्हेल माशाच्या उलटीमध्ये एम्बरग्रीसचा जवळपास तब्बल दिड किलोचा तुकडा मिळालाय.
या एम्बरग्रीसच्या तुकड्याची लांबी जवळपास 8 इंचाची आहे... आणि हा तुकड्याचा लिलाव जवळपास 7 लाख रुपयांमध्ये होण्याची शक्यता आहे.
एम्बरग्रीस हा खूप किंमती पदार्थ आहे. याचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. उल्लेखनीय म्हणजे, हा पदार्थ व्हेल माशाच्या शरीरातच तयार होतो... आणि जेव्हा व्हेल मासा उलटी करतो तेव्हा हा पदार्थ त्याच्या शरीरातून बाहेर पडतो. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या या एम्बरग्रीससाठी भली मोठी रक्कम मोजण्यासाठीही तयार असतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.