एक अजब स्पर्धा, 'कोण होणार पॉर्नस्टार'

कदाचित ही जगातील सर्वात विचित्र स्पर्धा असेल, याविषयी आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र अमेरिकेतील '९७ एक्स' या रेडिओने 'पॉर्नस्टार' बनण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.

Updated: Jan 21, 2015, 07:27 PM IST
एक अजब स्पर्धा,  'कोण होणार पॉर्नस्टार'  title=

वॉशिंग्टन : कदाचित ही जगातील सर्वात विचित्र स्पर्धा असेल, याविषयी आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र अमेरिकेतील '९७ एक्स' या रेडिओने 'पॉर्नस्टार' बनण्याची संधी देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे.

या स्पर्धेचा भाग म्हणून मॅजिक ब्रॉडकास्टिंग रॉक डब्लू.वाय.वाय.एक्स (९७ एक्स)/ पनामा सिटी या रेडिओ स्थानकाने, एका वेबसाईटला यात सहभागी करून घेतलं आहे. ही वेबसाईट एका संपूर्ण अश्लील आशय असलेली आहे, तसेच विजेत्या स्पर्धकाला वास्तवात पॉर्नस्टार बनविण्यासाठी या वेबसाईटला सोबत घेणय्यात आले आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना सहभाग घेण्यासाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे अर्जदार लैंगिक रोगापासून मुक्त असावेत, अशी अट ठेवण्यात आली आहे. 

'पनामा सिटी रेडिओने निवडलेल्या पहिल्या पाच स्पर्धकांमधून संबंधित वेबसाईटचे संचालक निवड करतील त्यांच्यासोबत वॅलेन्टाईन्स डेचा खास कार्यक्रम होईल.

विजेत्या स्पर्धकाचा कार्यक्रम १९ एप्रिल रोजी त्या संकेतस्थळावर लाइव्ह वेबकॅमद्वारे थेट प्रसारित करण्यात येणार आहे, त्यामध्ये पॉर्न अभिनेत्री जेनिफर व्हाइट, सारा जेई आणि लायला प्राइस या सहभागी होणार आहेत, असे संकेतस्थळाने म्हटले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.