उडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म

सिंगापूरवरून म्यानमारला जाताना सॉ लेर तू या महिलेनं गरोदर महिलेनं उडत्या विमानातच बाळाला जन्म दिला आहे.

Updated: Apr 29, 2016, 03:57 PM IST
उडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म title=

सिंगापूर: सिंगापूरवरून म्यानमारला जाताना सॉ लेर तू या महिलेनं गरोदर महिलेनं उडत्या विमानातच बाळाला जन्म दिला आहे. जेटस्टार एअरलाईन्सच्या विमानामध्ये या महिलेनं बाळाला जन्म दिला. जेटस्टार कंपनीच्या सुविधांमुळे खुष झालेल्या या महिलेनं बाळाचं नाव सॉ जेटस्टार ठेवलं आहे. याच विमानातून प्रवास करणारे तीन डॉक्टर आणि केबिन क्रूनं या महिलेची प्रसुती केली. 

चार तासांपेक्षा कमी प्रवासाला मिळते परवानगी

जेटस्टार ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय एअरलाईन क्वांटासची सहाय्यक कंपनी आहे. ही कंपनी गर्भवती महिलांना 40 व्या आठवड्यापर्यंत चार तासांच्या प्रवासाला परवानगी देते. 

एअरलाईननं सोशल मीडियावर दिली माहिती

उडत्या विमानामध्येच या महिलेनं बाळाला जन्म दिला असल्याची माहिती एअरलाईननं सोशल मीडियावर दिली. जेटस्टार एशियानं फेसबूक पेजवर बाळाचा फोटो शेअर केला आहे. या महिलेची तात्काळ मदत केल्याबद्दल एअरलाईननं केबिन क्रूचे आभार मानले आहेत. 

प्रवाशांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

या बाळाचं विमानातल्या प्रवाशांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. बाळाचं वजन सहा पाऊंडपेक्षा जास्त आहे. जेटस्टार एशिया विमानामध्ये जन्म घेणारं हे पहिलंच बाळ आहे.