स्त्रियांमधील असुरक्षित सेक्सचं वाढतंय प्रमाण

दहापैकी सात स्त्रिया दररोज असुरक्षित सेक्स करत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. १८ ते ४० वयोगटातील स्त्रियांपैकी अधिकतर स्त्रियांना याबद्दल पुरेशी कल्पना नसते. एक स्त्री चार विविध पुरूषांबरोबर अकरा वेळातरी असुरक्षित सेक्स करतात, असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Updated: Jun 10, 2012, 02:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

दहापैकी सात स्त्रिया दररोज असुरक्षित सेक्स करत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. १८ ते ४० वयोगटातील स्त्रियांपैकी अधिकतर स्त्रियांना याबद्दल पुरेशी कल्पना नसते. एक स्त्री चार विविध पुरूषांबरोबर अकरा वेळातरी असुरक्षित सेक्स करतात, असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे.

बहुतेक वेळा अशा संबंधात आपल्या पार्टनरकडून काँडमची अपेक्षा करणं त्या विसरून जातात. आपल्या पार्टनरकडून आपल्याला कुठलीही सेक्सशी संबंधित समस्या उद्भवणार नाही, अशी त्यांची खात्री असते. १८ टक्के तरुणींनी सांगितलं, की त्या नशेत असल्यामुळे सेक्सपूर्वी काँडम वापरण्यास त्या विसरून जातात. तर ८ % मुलींनी आपल्याला काँडम वापरून सेक्स करणं पसंत नसल्याचं सांगितलं.

२००० स्त्रियांच्या सेक्सवरील सर्वेक्षणावरून डॉक्टरांना या गोष्टींचा बोध झाला. असुरक्षित सेक्समुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. विशेषतः अशा स्त्रिया ज्या भविष्यात वेगळ्या पुरूषाबरोबर काँडम न वापरता सेक्स करू इच्छित असतात. बहुतेक वेळा तर त्या पुरूषांना ओळखतही नसतात. जवळपास १० टक्के स्त्रिया पुरूषांना काँडम वापरायला सांगण्यास लाजतात किंवा घाबरतात. मात्र, यातून एड्स किंवा तत्सम भयंकर आजार होऊ शकतात.