गडचिरोलीत तब्बल 17 हजार लोकांचा नोटाला कौल

मतदानाच्या दिवशी गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं, मात्र यात नोटा हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. गडचिरोलीत 17 हजार 510 मतदारांनी नोटा या पर्यायावर आपला कौल दिला. 

Updated: Oct 19, 2014, 06:59 PM IST
गडचिरोलीत तब्बल 17 हजार लोकांचा नोटाला कौल title=

गडचिरोली : मतदानाच्या दिवशी गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं, मात्र यात नोटा हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. गडचिरोलीत 17 हजार 510 मतदारांनी नोटा या पर्यायावर आपला कौल दिला. 

ही संख्या नंबर तीनवर आहे. भाजपचा उमेदवार सर्वाधिक सत्तर मतांनी विजयी झालाय. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 18 हजार 280 मतं आहेत, तर नोटा हा पर्यावर 17 हजार 510 मतं आहेत, ही संख्या नंबर तीनवर आहे.

नोटा हा पर्याय लोकसभा निवडणुकीपासून सुरू करण्यात आला आहे. सर्वात जास्त नोटा या पर्यायावर मतदान झाल्यास, फेरनिवडणूक घ्यावी किंवा नाही, यावर अजून ही निवडणूक आयोगाकडून निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.