राज्य सेवा हमी योजना लागू करणार, पहिला निर्णय

भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Updated: Nov 1, 2014, 12:15 AM IST
राज्य सेवा हमी योजना लागू करणार, पहिला निर्णय title=

UPDATE - 7.00 PM

*  शिवसेना आणि भाजपमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे - - मुख्यमंत्री फडणवीस 

*  उद्धव ठाकरेंना मी फोन केला, तसेच अमित शहांनी फोन केला - मुख्यमंत्री फडणवीस 
*  मंचावर साधू-संत होते, आमचा विरोध श्रद्धेला नाही, अंधश्रद्धेला आहे - मुख्यमंत्री फडणवीस 
*  कॅबिनेट निर्णयांची माहिती देणार - मुख्यमंत्री फडणवीस 
*  पत्रकारांचे अधिक प्रेम विरोधी पक्षावर असते, आमच्यावरही प्रेम करण्याची संधी देणार - मुख्यमंत्री फडणवीस 
*  गतीशिलता आणि गतीमानता संकलीत करणार - मुख्यमंत्री फडणवीस 
*  सर्व समावेशक योजना राबविणार, पारदर्शी कारभार करणार - मुख्यमंत्री फडणवीस 
*  मागील अाश्वासनांच्या पूर्ततेसाठी आढावा घेणार - मुख्यमंत्री फडणवीस 
*  मागील सरकारचे आश्वासनं पूर्ण करायची तर ५२ हजार कोटींची कर्ज काढावी लागणार -  - मुख्यमंत्री फडणवीस 
*  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करणार  - मुख्यमंत्री फडणवीस 
*  लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करणार  - मुख्यमंत्री फडणवीस 
*  रोल बदलण्याने दडपण वाटते  - मुख्यमंत्री फडणवीस 
*  इतके वर्ष पत्रकार परिषद घेतल्या दडपण वाटले नाही, आज वाटते - मुख्यमंत्री फडणवीस 
*  जनतेच्या अपेक्षाची जबाबदारी माझ्यावर - मुख्यमंत्री फडणवीस 
*  पारदर्शकता आणि कार्यन्वियता  असावी - मुख्यमंत्री फडणवीस 
*  सेवा हमी विधेयक आणणार - - मुख्यमंत्री फडणवीस 
*  जनतेला सेवा मिळत नाही, म्हणून जनतेचा रोष असतो -  मुख्यमंत्री फडणवीस 
*  प्रत्येक विभाग कोणती सेवा देतात, याची यादी तयार होणार - मुख्यमंत्री फडणवीस

UPDATE - 6.58 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिली कॅबिनेट बैठक संपली, थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू 

UPDATE - 6.31 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिली कॅबिनेट बैठक सुरू 

UPDATE - 5.52 PM

मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केले नवी मंत्र्यांचे स्वागत 

एकनाथ खडसे, विनोद तावडे मंत्रालयात दाखल

 

UPDATE - 4.50 PM

मोदींनी दिली नव्या मंत्र्यांना शुभेच्छा

 

UPDATE - 4.45 PM

विद्या ठाकूर घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ 

दिलीप कांबळे यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ 

विष्णू सावरा यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून  शपथ 

 

UPDATE - 4.43 PM

पंकजा गोपीनाथ मुंडे  यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून  शपथ 

प्रकाश मेहता यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून  शपथ 

चंद्रकांत पाटील  यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून  शपथ 

 

UPDATE - 4.30 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ 

एकनाथ खडसे यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून   शपथ 

सुधीर मुनगंटीवर यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून   शपथ 

विनोद श्रीधर विजया तावडे  यांनी घेतली  कॅबिनेट मंत्री म्हणून   शपथ 

UPDATE - 4.26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित... 

UPDATE - 4.14 PM

नीलम गोऱ्हे, दिवाकर रावते वानखेडेच्या गेट नं. ३ जवळ ताटकळत उभे... 

UPDATE - 4.07 PM

सदाभाऊ खोत आणि अजित पवार यांच्यात व्यासपीठावर चर्चा... 

UPDATE - 4.03 PM

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील,  
प्रकाश सिंग बादल, ओम माथुर, एकनाथ खडसे, उपस्थित 
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित

4.00 PM

उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना.

छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, 

3.58 PM

वानखेडे स्टेडिअमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे फोटो..

मुख्य व्यासपीठावर पंकजा मुंडे, शहनावज हुसैन, राजीव प्रताप रुडी,  छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे उपस्थित

3.51 PM

शपथविधी सोहळ्याला रामदास आठवले उपस्थित

महादेव जानकर, राजू शेट्टी, विनायक मेटे मुख्य व्यासपीठावर उपस्थित

3.43 PM

सर्व धर्माचे गुरू शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

जैन मुनी, साधू, संत, मौलवी उपस्थित

3.40 PM

शपथविधीला जाण्यासाठी मातोश्रीवर लगबग सुरू

उद्धव ठाकरे थोड्याच वेळात होणार रवाना

3.00 PM

वानखेडे स्टेडियमवर मराठी बाणा कार्यक्रम सुरु

2.55 PM

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार 
। उद्धव ठाकरेंना उपस्थित राहण्याचे भाजपकडून निमंत्रण आले
। भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उद्धव यांना फोन आला - विनायक राऊत

2.10 PM

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता?
। उद्धव ठाकरेंना उपस्थित राहण्याचे भाजपकडून निमंत्रण
। भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उद्धव यांना फोन

2.08 PM
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे  यांनी उपस्थित राहण्याचा फोन

1.55 PM

मुंबई : भाजपचे मित्र पक्ष नाराज
। महादेव जानकर, राजू शेट्टी, रामदास आठवले नाराज
। भाजपच्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याने व्यक्त केली नाराजी

1.50 PM
मित्रपक्षांसोबत केलेला व्यवहार रुचलेला नाही - महादेव जानकर
भाजपने दिलेलं आश्वासन पाळलं नाही, मात्र त्यांच्यापर्यंत नाराजी पोहोचवलेली नाही - जानकर
मंत्रिपद न दिल्याने घटक पक्ष नाराज, राजू शेट्टी, महादेव जानकर व्यासपीठाऐवजी प्रेक्षकांमध्ये बसणार 

13:35 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची  प्रोफाईल

कॅबिनेट मंत्री
देवेंद्र फडणवीस @ :
भाजपचे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री
विदर्भातील चौथे मुख्यमंत्री बनण्याचा मान
नागपूरमधून सलग चारवेळा आमदार
नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री
2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष

एकनाथ खडसे @ :
सलग सहावेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेवर
युती सरकारमध्ये अर्थ, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री
विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम कामगिरी
कोथळी गावचे सरपंच ते भाजपचे ज्येष्ठ नेते
खान्देशातील भाजपचा चेहरा 

सुधीर मुनगंटीवार @ :
सलग पाचवेळा विधानसभेचे आमदार
माजी प्रदेशाध्यक्ष, गडकरींचे खंदे समर्थक 
युती सरकारमध्ये पर्यटन, ग्राहक संरक्षण मंत्री
अनुभवी, अभ्यासू, वक्तृत्व असलेला नेता
बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीत योगदान 
 
विनोद तावडे @ :
विधान परिषदेतील प्रभावी विरोधी पक्षनेते
मुंबई भाजपचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान
भाजपमधील मराठा नेतृत्व
अभाविपच्या माध्यमातून भाजपमध्ये सक्रीय
सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध
 
पंकजा पालवे @ : 
परळीतून दुस-यांदा आमदार
भाजप कोअर कमिटीच्या सदस्या
मराठवाड्यातील भाजपचा मोठा चेहरा
गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार
स्त्री भ्रूण हत्येस पायबंद घालण्यासाठी लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान

प्रकाश मेहता @ :
सलग सहावेळा घाटकोपरमधून आमदार
मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष
युती सरकारच्या काळात उत्पादन शुल्क मंत्री
मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
आणिबाणी विरोधी आंदोलनात सहभाग
 
विष्णू सावरा @ :

विक्रमगडचे विद्यमान आमदार
सहावेळा विधानसभेवर निवड
आदिवासी नेता अशी ओळख
युती सरकारच्या काळात आदिवासी विकासमंत्री
नव्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता

चंद्रकांत पाटील @ :
सामाजिक प्रश्नांची जाण असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते
शिक्षण - बी. कॉम
1980 ते 1993 - विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते
1995 ते 1999 - आरएसएसचे कोल्हापूर विभाग सहकार्यवाह
2008 पासून पुणे पदवीधरमधून विधान परिषदेवर सदस्य

महाराष्ट्र विधान परिषदेत भाजपचे प्रतोद 
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम 
भाजप महाराष्ट्र प्रदेशचे माजी सरचिटणीस 
शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सरचिटणीस

राज्यमंत्री

विद्या ठाकूर @ :
गोरेगावमधून भाजपच्या आमदार
भाजपचा उत्तर भारतीय चेहरा
मुंबईच्या माजी उपमहापौर
मुंबई मनपात चारवेळा नगरसेविका

दिलीप कांबळे @ :
पुणे कँटोन्मेंटमधून दुस-यांदा विजयी
युती सरकारच्या काळात राज्यमंत्री
भाजपचा दलित चेहरा
स्वारगेट एसटी स्थानकातले एकेकाळचे फुलविक्रेते

 13:30 PM

विद्या ठाकूर आणि दिलीप कांबळे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार

देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता कॅबिनेट पदाची शपथ घेण्याची शक्यता.

देवेंद्र फडणवीसांसह दहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार, यामध्ये आठ कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदांचा समावेश, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

 13:20 PM

शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित 

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी दोघेही दुपारी विशेष विमानाने मुंबईला येणार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.