हे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच!

मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 13, 2014, 08:12 AM IST
हे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच! title=

मुंबई : मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. 

अर्थात, हे अंदाज म्हणजे काही भाकीत नव्हे... काही मतदारांच्या विचारांचा, अपेक्षांचा मागोवा घेत ठराविक आकड्यांपर्यंतपर्यंत या सगळ्याच संस्था पोहचलेल्या असतात. पण, मतदारांनो... लक्षात घ्या... हे केवळ 'अंदाज' आहेत... शेवटी निकाल तोच लागणार आहे, ज्याला मतदार प्रत्यक्ष कौल देणार आहेत...

विविध संस्थांच्या अंदाजानुसार वेगवेगळ्या पक्षाला कौल मिळालेला आहे... एक नजर टाकुयात कुणी कोणत्या पक्षासाठी किती जागांचा अंदाज व्यक्त केलाय.

पक्ष / सर्व्हे झी 24 तास - 1 झी 24 तास - 2 झी 24 तास - 3
भाजप   90 96 110
शिवसेना  61 57 52
राष्ट्रवादी 38 40 39
काँग्रेस 72 63 68
मनसे  6 9 7
अपक्ष-इतर 21 23 12

 

पक्ष / सर्व्हे

एबीपी + नेल्सन

हेडलाईन्स टुडे

आज तक

द वीक + हंसा

इंडिया टुडे

सी व्होटर सकाळ
भाजप   120 57 (51-63) 125 - 141 154 133 (125-141) 105 94
शिवसेना 67 133 (125-144) 51 - 63 47 57 (51-63) 45 61
राष्ट्रवादी 36 33 (28-38) 28 - 38 17 33 (28-38) 52 59
काँग्रेस  46 30 (25-35) 25 - 35 25 30 (25-35) 37 51
मनसे    8 10 (7-13) 7-13 10 10 (7-13) 21 23 (मनसे+अन्य)
अपक्ष-इतर  11 25 (20-30)   20 25 (20-30) 28  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.