कोल्हापूरकरांनी केली होती कमाल

2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी कमाल केली. राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद ज्या मतदारसंघात झाली, ते टॉप थ्री मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातले होते.

Updated: Oct 15, 2014, 10:30 AM IST
कोल्हापूरकरांनी केली होती कमाल  title=

मुंबई : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी कमाल केली. राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद ज्या मतदारसंघात झाली, ते टॉप थ्री मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातले होते.

करवीरमध्ये सर्वाधिक म्हणजे 83.82 टक्के नागरिकांनी रेकॉर्डब्रेक मतदान केलं. त्यापाठोपाठ कागलमध्ये 81.26 टक्के, तर शाहूवाडीत 80.08 टक्के मतदान झालं.

नांदेडमधील लोहा मतदारसंघात 78.64 टक्के, तर सांगलीतल्या पलूस कडेगावमध्ये 78.30 टक्के मतदानाची नोंद झाली. आता करवीरकर आपलं टॉपचं स्थान टिकवून ठेवतात, की कागल आणि शाहुवाडीवाले यंदा बाजी मारणार? 

सांगलीकरांनो, कोल्हापूरकरांना मागे टाकण्याची संधी तुम्हालाही आहे. नांदेडकरांनो, मराठवाडा भी कुछ कम नही, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे... चला तर मग, घराबाहेर पडा आणि रेकॉर्डब्रेक मतदान करा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.