आमचा विजय तर होणारच - उद्धव ठाकरे

मुंबईमध्ये महायुतीची जाहीर सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. आगामी काळात अजित पवार आणि आर.आर. पाटील यांनी मोर्चे काढण्याची तयारी करून ठेवण्याचा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. तर भ्रष्टाचारी कलमाडींचं स्वागत कशासाठी ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी टोकेची झोड उठवली.

Updated: Feb 5, 2012, 09:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईमध्ये महायुतीची जाहीर सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. आगामी काळात अजित पवार आणि आर.आर. पाटील यांनी मोर्चे काढण्याची तयारी करून ठेवण्याचा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. तर भ्रष्टाचारी कलमाडींचं स्वागत कशासाठी ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी टोकेची झोड उठवली.

उद्धव ठाकरे यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मानखुर्द येथे जाहीर सभा घेतली. या सभेत उद्घव ठाकरे यांनी निवडणुकीत विजय मिळणारच असा विश्वास निर्माण केला. 'महायुतीची ताकद काँग्रेस-NCP ला माहित आहे', 'ही निवडणूक आम्ही जिकंणारच' ही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी केला. तसचं आदर्श घोटाळावर देखील उद्धव यांनी सगळ्यांनाच टीकेचं लक्ष केलं. 'आदर्श घोटाळ्याचा बाप कोण हे आधी ठरवा' असा सवालच उद्धव ठाकरेंनी विचारला.

तर दुसरीकडे उद्घव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला हाणत 'आम्हांला मैदानाची गरज नाही' असं म्हणून राज यांच्या मैदानावरील प्रश्नाला चागंलच उत्तर दिलं, तर 'टगे अजित पवार गुंडाचा बंदोबस्त करू शकत नाही', 'तसचं निवडणुकीत आमचा विजय तर होणारच आहे, 'मुंबईच्या गल्ली बोळात हा विजय साजरा केला जाणार आहे', असं विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसचं आठवलेंना दिलेल्या जागा जिंकून आणणार असा देखील घोषणा उद्धव यांनी केली आहे.

[jwplayer mediaid="42270"]