मुंबई काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी ११९ जणांची यादी जाहीर केली आहे. महापालिकेत यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाटेला ११९ जागा आल्या आहेत.

Updated: Jan 31, 2012, 11:31 AM IST

www.24taas.com, मुंबई 

 

अर्ज भरण्याची मुदत संपण्याला अवघा एक दिवस शिल्लक असतानाच, काँग्रेसनं मुंबई मनपा निवडणुकीसाठी 119 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस एकूण 169 जागांवर लढणार असून, त्यातल्या 119 वॉर्डांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

 

या यादीत सुमारे 56 मराठी उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसचे माजी मतदार सदा सरवणकर यांच्या मुलगा समाधान सरवणकर यांना वॉर्ड क्रमांक 182 मधून उमेदवारी देण्यात आलीय. तर गुरुदास कामत यांचे भाचे आणि विद्यमान नगरसेवक समीर देसाई य़ांच्याही उमेदवारीची घोषणा करण्यात आलीय.

 

भाजपतून काँग्रेसमध्ये गेलेले प्रवीण छेडा यांना वॉर्ड क्रमांक 124 मधून उमेदवारी देण्यात आलीय. उर्वरित 50 वॉर्डांच्या उमेदवारांची यादी उद्या ऐनवेळी होण्याची शक्यता आहे.

 

काँग्रेसची यादी पुढील प्रमाणे

 

 

क्रमांक काँग्रेस उमेदवारांची यादी वार्ड क्र.
1 शितल म्हात्रे
2 संदेश कोंडविलकर
3 शिवानंद शेट्टी
4 दिपिका पांचाळ १२
5 सुशिला रांभिया १४
6 भूषण पाटील १६
7 रुक्साना सिद्धिकी १९
8 रामाशिष गुप्ता २१
9 रश्मी मेस्त्री २२
10 पुष्पा धाकड २३
11 योगेश भोईर २४
12 अजंता यादव २५
13 गीता यादव २८
14 नॅक्सन नक्ते २९
15 शिराज शेख ३०
16 कमलप्रसाद यादव ३३
17 सुधीर भरडकर ३४
18
Tags: