ती संध्या'काळ'... आठवणी १३ जुलैच्या

१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्मस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांचा हाती लागला नाही.

Updated: Jul 13, 2012, 08:34 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांच्चा हाती लागला नाही.

 

पहिला बॉम्बस्फोट - १३ जुलै २०११, वेळ- ६.५४, ठिकाण- झवेरी बाजार, घटना- स्कूटर मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू, चार जखमी.

दुसरा बॉम्बस्फोट - वेळ- ६.५५, ठिकाण- ऑपेरा हाऊस, घटना- मोटर सायकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू, ६ जखमी.

तिसरा बॉम्बस्फोट - वेळ – ७.०६, ठिकाण- कबूतर खान, दादर, घटना- बेस्ट बस स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू.

 

भर संध्याकाळी काही मिनिटांचा अंतरावर झालेल्या या तिहेरी बॉम्बस्फोटाने एकच खळबळ उडाली. मुंबईचे रस्ते निष्पाप व्यक्तींचा रक्ताने माखलं. फोनलाईन्स जाम झाल्या. अचानक झालेल्या या बॉम्बस्फोटाने पोलीसांची झोप उडाली.

 

मुंबईला हादरुन टाकणाऱ्या या बॉम्बस्फोटांचा तपास एटीएसने सुरु केला. तपासादरम्यान एटीएसची टीम देशभरात दहशतवाद्यांचा शोधात फिरली. या बॉम्बस्फोट प्रकरणी पहिल यश पोलिसांच्या हाती लागलं १५ जानेवारीला... पोलिसांनी नकी अहमद आणि नदीम अख्तर या दोन आरोपींना बॉम्बस्फोटांप्रकरणी अटक केली. तपासादरम्यान हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासीन भटकळने घडवून आणल्याचं निष्पण्ण झालं. पाकिस्तानचे दोन दहशतवादी तबरेज आणि वकास यांनी यासीन सोबत मिळून भायखळाचा हबीबी मेन्शन बिल्डींगमध्ये बॉम्ब तयार केला होता. या बॉम्बस्फोटांमागे काम करत असलेल्या दरभंगा मोड्युलला ब्रेक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलीसांनी लवकरात लवकर या बॉम्बस्फोटांचा गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीय करत आहेत.