अशोक चव्हाण अडकले, आरोपपत्र दाखल झाले....

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अखेर आज आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह १३ जणांची नावं आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल १८ महिन्यांनी १० हजार पानांचे आरोपपत्र सेशन कोर्टाच्या रजिस्ट्रारसमोर ठेवण्यात आलं.

Updated: Jul 4, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अखेर आज आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह १३ जणांची नावं आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल १८ महिन्यांनी १० हजार पानांचे आरोपपत्र सेशन कोर्टाच्या रजिस्ट्रारसमोर ठेवण्यात आलं. आदर्शप्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे अधिकार नसल्याच्या प्रतिज्ञापत्रावर आता सीबीआय आणि हायकोर्ट काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

तसंच आज सीबीआयकडून आदर्शप्रकरणी काही जणांवर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं हायकोर्टात काल प्रतिज्ञापत्र दाखल केलं  असून आदर्शच्या सीबीआय करीत असलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आदर्शची जमीन सरकारच्या मालकीची आहे. यामुळं याबाबत गैरव्यवहार झाला असेल तर त्याचा तपास करण्याचा अधिकार हा सीबीआयला नसून राज्य पोलीस दलाला आहे.

 

असा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. आदर्श आरोपींच्या वकिलांनी मागील सुनावणीवेळी सीबीआयच्या अधिकाराबाबत असाच आक्षेप नोंदवला होता. आता राज्य सरकारनंही असाच आक्षेप घेतला आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीवेळी सीबीआय आणि हायकोर्ट काय भूमिका घेते याकडं लक्ष लागलं आहे.