एक्सप्रेस हायवेवर 'टोलधाड '

Last Updated: Friday, December 16, 2011 - 13:05

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईत त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेले टोल नाके प्रवाशांची अक्षरशः लूट करतायत. टोल वसुलीच्या नावाखाली अनेकांकडून पैशाची  मोठ्याप्रमाणात  फसवणूक होत आहे.

 

या टोल नाक्यांचा प्रकल्प खर्च आणि रस्त्यांचा खर्च कधीच वसूल झालाय. प्रकल्प खर्चाच्यापेक्षा जास्त रक्कम केव्हाच वसूल झालीय. तरीही फक्त नफ्याच्या दृष्टीनं प्रवाशांची लूट सुरु आहे. ही लूट आणखी काही वर्षं सुरुच राहणार आहे. कल्याणचे रहिवासी श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात लूट होत असल्याची ही बाब उघड केलीय.

 

घाणेकर आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केलीय, त्याचबरोबर कोर्टामध्ये जनहित याचिकाही दाखल करण्यात आलीय. टोल वसुलीसाठी ज्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येतं, त्यानं प्रोजेक्ट कॉस्ट अर्थात प्रकल्प खर्च वसूल होण्यासाठी आणि काही प्रमाणात नफ्याच्या दृष्टीनं टोल आकारणं गरजेचं असतं. पण कंत्राटदारानं त्यामधून वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवू नये, असं या याचिकेत म्हंटलंय.First Published: Friday, December 16, 2011 - 13:05


comments powered by Disqus