काँग्रेसची मेहरनजर, झाला निवडणुकीचा गजर

जे. जे. हॉस्पिटल एम्सप्रमाणे अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Updated: Jan 2, 2012, 06:53 PM IST

24taas.com, मुंबई

 

जे. जे. हॉस्पिटल एम्सप्रमाणे अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारने मुंबईवर मेहरनजर केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

 

मुंबईसारख्या शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे, त्यामुळे जेजेच्या आवारतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून, २० मजली इमारत बांधण्यात येईल. यात ४७९ कोटी रुपये बांधकाम खर्चासाठी, तर १५० कोटींची नवी यंत्रसामुग्री आणणार आहेत, तसचं अतिरिक्त कर्मचा-यांसाठी १९ कोटींची दरवर्षी तरतूद करण्यात येईल, एकूण ६२९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल.

 

तसचं येत्या वर्षात अलिबाग, नंदूरबार, सातारा आणि मुंबई  या चार ठिकाणी सरकारी मेडिकल हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. तसचं मुंबई पूर्व आणि पश्चिम विभागात ३०० बेडचं हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेतलेत.

 

[jwplayer mediaid="22587"]