कलाकार हेमा उपाध्याय खूनाची कॅमेऱ्यासमोर कबुली

मुंबईतल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी एका आरोपीनं थेट कॅमे-यासमोर कबुली दिलीय. चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचा वकीलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. 

Updated: Dec 15, 2015, 06:07 PM IST
कलाकार हेमा उपाध्याय खूनाची कॅमेऱ्यासमोर कबुली  title=

मुंबई : मुंबईतल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी एका आरोपीनं थेट कॅमे-यासमोर कबुली दिलीय. चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचा वकीलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. 

शिवकुमार राजभर असं या आरोपीचं नाव असून त्याला बनारसमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राजभरनं या दुहेरी हत्याकांडाची कॅमे-यासमोरच धक्कादायक कबुली दिली आहे. 

आपल्या मालकाच्या सांगण्यावरून दोघांची हत्या केल्याचं राजभरनं सांगितलंय. या दुहेरी हत्याकांडात यापूर्वीच तीन आरोपींना अटक केली आहे. राजभरला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरिश बंबांनी यांचेी हत्या करून त्यांचे मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकण्यात आले होते. याप्रकरणी हेमाचा पती चिंतन उपाध्यायचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.