विरोधी पक्षनतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता

शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्यानं आता काँग्रेसला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष असेल. 

Updated: Dec 3, 2014, 11:59 AM IST
विरोधी पक्षनतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता  title=

मुंबई: शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्यानं आता काँग्रेसला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष असेल. 

काँग्रेसला ५ आमदारांच्या निलंबनाचा फटका बसणार नाहीय. विरोधी पक्षनेता निवडतांना संख्याबळाला महत्त्व दिलं जातं. निवडणुकीच काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचं ४१ आमदार आहेत. त्याच आधारे विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. 

जर निवडणुकीतच दोन विरोधी पक्षांचं समान संख्याबळ असेल, अशा परिस्थितीत मतदान घेतलं जातं. पण आता काँग्रेसचा १ आमदार जास्त आहे. त्यामुळं विरोधी पक्षनतेपद काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.