आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेला कलगीतुरा काही संपायचं नाव घेत नाहीये. 

Updated: Jun 26, 2016, 11:43 PM IST
आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेला कलगीतुरा काही संपायचं नाव घेत नाहीये. 

आज जाळपोळ करणा-यांनी उद्या त्यांच्या वर्तमान पत्राच्या जाळपोळीसाठी तयार रहावे असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय. 

भाजपाचं पाक्षिक 'मनोगत'मध्ये उद्धव ठाकरेंची तुलना असराणीसोबत केल्याने शिवसैनिकांनी मनोगतच्या प्रति जाळल्या होत्या. त्याच सोबत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचाही पुतळा जाळण्यात आला होता. त्यावर आशिष शेलारांनी शिवसेनेला हा इशारा दिलाय.