'तेलगी'वरून अजितदादांनी जितेंद्र आव्हांडाना झापले...

तेलगीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सभागृहात तेलगीचा उल्लेख केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले. 

Updated: Jul 23, 2015, 08:36 PM IST
'तेलगी'वरून अजितदादांनी जितेंद्र आव्हांडाना झापले... title=

मुंबई : तेलगीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सभागृहात तेलगीचा उल्लेख केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले. 

आव्हाडांनी तेलगीवरून भाजप आमदार अनिल गोटेंना डिवचल्यामुळं गोटेंनी भुजबळांवर खळबळजनक आरोप केले. यामुळं भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळं अजित पवारांनी आव्हाडांना धारेवर धरलंय. 

तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी आव्हांडांचं कौतुक करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसींचे नेतृत्व आव्हाडांकडे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. 

विविध घोटाळ्यांच्या चौकशीमुळं सध्या भुजबळ अडचणीत आले आहेत. त्यात तेलगी प्रकरणी आरोप झाल्यामुळं आणखीनच त्यांची प्रतिमा मलिन करण्याची खेळी होती का अशीही चर्चा आता राजकीय विश्वात रंगलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.