10 वर्षातील सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी होणार - मुनगंटीवार

पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. 

Updated: Jul 7, 2015, 10:43 PM IST
10 वर्षातील सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी होणार - मुनगंटीवार title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. 

यामध्ये राज्यातल्या 4000 भांडारांची चौकशी होणार असून त्यासाठी सहा पथकांची नेमणूक करण्यात आलीय. खरेदी केलेलं साहित्य योग्य ठिकाणी पोचलं का, किती साहित्य पोचलं, त्याचा उपयोग झाला का, या सर्व बाबींची सरकार चौकशी करणार आहे. 

तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.