महाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Updated: May 18, 2014, 11:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
`मिशन महाराष्ट्र`ची जवाबदारी सांभाळण्यासाठी अमित शहा जुलै महिन्यात महाराष्ट्रात येण्याची चिन्ह आहेत. यावेळी महाराष्ट्रात येऊन अमित शहा हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतील, तसेच नंतर विधानसभा निवडणूक होईपर्यंत ते महाराष्ट्रातच थांबून राहतील. राज्यात भाजपचा सध्यातरी कोणताही आक्रामक चेहरा नाही. या कारणाने अमित शहांना महाराष्ट्र भाजपकडून प्रचारासाठी पसंती दिली जात आहे.
उत्तर प्रदेशात अमित शहांनी प्रभारी पद हातात घेतल्यावर उत्तर प्रदेशातून भाजपला सगळ्यात जास्त ७१ जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशमध्ये चाललेली शहांची जादू महाराष्ट्रातही चालू शकते, या कारणानेच मोदी अमित शहांना महाराष्ट्रात पाठवण्याची तयारी करत आसल्याचे समजते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.