सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!

भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 23, 2017, 01:56 PM IST
सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...! title=

मुंबई : भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत. जर तुम्ही यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल, तर तुमच्या गाडीचा टायर फुटण्याची शक्यता तेवढीच जास्त आहे.

परदेशात प्रति तास २०० किमी जास्तीत जास्त वेग याप्रमाणे टायर बनवण्यात आले आहेत. भारतात ८० हा सरासरी स्पीड मानून टायर कंपन्या टायर बनवतात, म्हणून एक्स्प्रेसवेवर टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.

३० हजार किंवा ठरवून दिलेल्या मर्यादेप्रमाणे टायर बदलून घेतला पाहिजे, गुळगुळीत झालेला टायर तुमच्यासह समोरचाही जीव घेऊ शकतो. 

उद्योजक  डी एस के यांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर २०१६ साली अपघात झाला होता, त्यावेळी ते जखमी झाले होते, यात त्यांचा ड्रायव्हर मृत्यूमुखी पडला होता, त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.

उन्हाळ्यात टायरमध्ये योग्य दाब नसल्याने, टायर फुटून अपघात होतात, या घटना टाळता याव्यात यासाठी वरीलप्रमाणे खरबदारी घेणे महत्वाचे आहे.