बेस्टच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता

बेस्टच्या किमान भाड्यात  १ रूपयाची वाढ करण्यात आली आहे, ही वाढ १ फेब्रुवारी २०१५ पासून लागू होण्याची शक्यता आहे. ही भाडेवाढ लागू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी ७ रूपये मोजावे लागणार आहेत.

Updated: Nov 19, 2014, 08:27 PM IST
बेस्टच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता title=

मुंबई : बेस्टच्या किमान भाड्यात  १ रूपयाची वाढ करण्यात आली आहे, ही वाढ १ फेब्रुवारी २०१५ पासून लागू होण्याची शक्यता आहे. ही भाडेवाढ लागू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी ७ रूपये मोजावे लागणार आहेत.
 
सर्वात महत्वाचं म्हणजे, एप्रिल आधी जर महापालिकेनं बेस्टला आर्थिक मदत केली नाही, तर बेस्टला एप्रिलपासून आणखी एक रुपया दरवाढ करणे अटळ असल्याचं बेस्टच्या प्रशासनानं सांगितलंय.
 
वास्तविक पाहता ही भाडेवाड यापूर्वीच होणार होती. पण शिवसेना-भाजपने ही भाडेवाढ होणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र ही अटळ होती. सेना-भाजपने निवडणुकीच्या पुढे मुंबईकरांची दिशाभूल केल्याची भावना जाणकारांनी व्यक्त केली.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत असताना दुसरीकडे बेस्टनं मात्र आपल्या भाड्यामध्ये वाढ केल्यानं प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.