छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा वळण योजेनेचे रखडलेले काम तातडीनं सुरु करण्यासाठी भुजबळांनी हे पत्र लिहिलंय. 

Updated: Apr 7, 2016, 05:09 PM IST
छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र title=

मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा वळण योजेनेचे रखडलेले काम तातडीनं सुरु करण्यासाठी भुजबळांनी हे पत्र लिहिलंय. 

सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून तपासणी करण्याच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यानं ऑक्टोबर 2014 पासून प्रकल्पाचं काम बंद पडलंय. 

या प्रकल्पाबाबत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वासन दिलं होतं. या प्रकल्पासाठी भुजबळांनी सभागृहात वेलमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केलं होतं.. आता याच योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी भुजबळांनी जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय.