रेल्वेप्रवासादरम्यान खांबाला आदळून तरुण जखमी

वानखेडे स्टेडियम बघण्याच्या नादात रेल्वेतून पडून एक तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत घडली. ब्रिजभूषण पांडे असं १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. 

Updated: Jan 23, 2016, 03:44 PM IST
 रेल्वेप्रवासादरम्यान खांबाला आदळून तरुण जखमी title=

मुंबई : वानखेडे स्टेडियम बघण्याच्या नादात रेल्वेतून पडून एक तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत घडली. ब्रिजभूषण पांडे असं १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. 

सांतांक्रुझ येथून तो चर्चगेटच्या दिशेने मित्रांसोबत रेल्वेतून प्रवास करत होता. मरिन लाईन्स स्टेशन सोडल्यानंतर चर्चगेटच्या दिशेने रेल्वे जात असताना वानखेडे स्टेडियम बघण्याच्या नादात त्याची धडक खांबाला बसली. यामुळे त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. 

दरम्यान, त्याला तातडीने जी. टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले.