धक्कादायक | छगन भुजबळांच्या फोटोमागचं सत्य

 छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

Updated: Apr 25, 2016, 01:47 PM IST
धक्कादायक | छगन भुजबळांच्या फोटोमागचं सत्य  title=

मुंबई : छगन भुजबळ यांचा फोटोमध्ये उजव्या बाजूला दिलेला फोटो व्हायरल झाला आहे, सुरूवातीला हा भुजबळांचाच फोटो आहे का यावर कुणाचाच विश्वास होत नव्हता, पण हा भुजबळांचाच फोटो असल्याची चर्चा आता ऑनलाईन मीडियात सुरू झाली आहे.

छगन भुजबळांवर 'चर्चा तर होणारच'

छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. छगन भुजबळ यांच्यावर एवढी चर्चा का? असं अनेकांना काही दिवसानंतर वाटेल, पण भाऊ चर्चा तर होणारच.. कारण छगन भुजबळ यांच्याकडे एकेकाळी राज्याचं गृहखातं होतं, त्यांच्या सांगण्यावरून गृहखात्यात 'राजा बोले आणि दल हाले' अशी परिस्थिती होती.

राजा बोले आणि दल हाले

शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचं भाष्य आणि धाडसंही याच भुजबळांनी केलं होतं हा इतिहास आहे, पण तेच भुजबळ आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये दिवस काढतायत हा सुद्धा राज्याच्या राजकारणाचा इतिहास होणार आहे.

जेल की रोटी

छगन भुजबळांच्या सोबत त्यांचा पुतण्या समीर देखील आर्थर रोड जेलमध्ये आहे. भुजबळांना सुरूवातीला 'जेल की रोटी' काही खायची इच्छा होत नव्हती. म्हणून हायप्रोफाईल केसमधील आरोपी पिटर मुखर्जी यांना घरून आलेल्या डब्यात ते जेवत होते.

हम साथ साथ है...

राष्ट्रवादीचे आणखी एक माजी आमदार रमेश कदम हे देखील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. छगन भुजबळ, रमेश कदम आणि पीटर मुखर्जी हे एकच बराकीत असल्याचं सांगण्यात येतंय. तर छगन भुजबळ यांचं या दरम्यान १० किलो वजन कमी झालं असल्याचं सांगण्यात येतंय. जेलच्या कैद्यांना सकाळचं जेवण अकरा वाजता, तर सायंकाळी ५ वाजता जेवण दिलं जातं.