प्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद

अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.

Updated: Sep 7, 2016, 04:51 PM IST
प्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद title=

मुंबई : अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठं विद्यार्थ्यांची लूट करत असल्याचा सरकारचा दावा आहे. अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया त्या त्या राज्य सरकारांनी राबवावी असे केंद्राचे आदेश आहेत. मात्र हे आदेश विद्यापीठांनी धुडकावले आहेत. यापूर्वी हायकोर्टाने या प्रकरणाला स्थगिती दिली होती. हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय. राज्य सरकार प्रवेश प्रक्रियेसाठी 1 हजार रूपये घेतं तर अभिमत विद्यापीठ 5 हजार रूपये घेतात. विद्यार्थ्यांना 8 अभिमत विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेसाठी 40 हजार रूपये खर्च करावे लागतात.