दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.

Updated: May 12, 2016, 07:59 PM IST
दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल title=

मुंबई : राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र असल्याने महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा जलदूत एक्सप्रेसने पाणी लातूरला पोहोचवले. रेल्वेने आतापर्यंत ६.२० कोटी लिटर पाणी दुष्काळग्रस्त लातूरला पोहोचवले आहे. याचा वाहतूक खर्च रेल्वेने वसूल करण्यासाठी ४ कोटी रुपयांचे बिल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. 
 
प्रशासनाच्या विनंतीवरुन आम्ही लातूर जिल्हाधिकाऱ्यांना हे बिल पाठवले आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथे पाणी भरल्यानंतर ११ एप्रिलला पहिली जलदूत एक्सप्रेस लातूरला रवाना झाली. १२ एप्रिलच्या मध्यरात्री ट्रेन लातूरमध्ये दाखल झाली. 
 
जलदूत एक्सप्रेसला १० डब्बे जोडलेले होते. प्रत्येक डब्ब्यामध्ये ५० हजार लीटर पाणी साठवण्याची क्षमता होती. त्यामुळे पहिल्या काही फे-यांमध्ये प्रत्येकवेळी पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवण्यात आले.