शिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक

आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Updated: Jan 16, 2017, 08:24 AM IST
शिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक title=

मुंबई : आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

युतीचा निर्णय घेण्यासाठी या समितीची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन पाच दिवस उलटले तरीही सेना-भाजपाच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही. संक्रांतीचं कारण सांगून युतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता आजचा मुहूर्त साधत युतीसंदर्भात पहिली बैठक होत आहे.