फ्लिपकार्ट मुल दत्तक घेणाऱ्यांना ५० हजार देणार

ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने मुल दत्तक घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ५० हजार रूपये खर्च देऊ केला आहे. 

Updated: Jul 13, 2015, 05:16 PM IST
फ्लिपकार्ट मुल दत्तक घेणाऱ्यांना ५० हजार देणार title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने मुल दत्तक घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ५० हजार रूपये खर्च देऊ केला आहे. 

'फ्लिपकार्ट'कडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्‍या दत्तक भत्त्यामुळे मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रीयेतील कर्मचाऱ्यांचा काही खर्च कमी होण्यात मदत होणार आहे. दत्तक भत्ता दत्तक प्रक्रीयेच्यावेळी उद्भवणारे इतर खर्च, कायदेशीर, एजन्सी यांच्यासाठी देण्यात येणार आहे. 

फ्लिपकार्टच्या कोणत्याही महिला कर्मचार्‍याने १२ महिन्याखालील वयाच्या बाळाला दत्तक घेतल्यास कर्मचारी प्रसूती रजा धोरणाअंतर्गत त्यांना सहा महिन्यांची समान पगारी रजा देण्यात येईल. शिवाय चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या सोयीची वेळ कामासाठी दिली जाणार असल्याचं फ्लिपकार्टच्या वतीने सांगण्यात येणार आहे,

एखाद्या बाबतीत कर्मचार्‍याला सहा महिन्यांपेक्षा अधिक रजा घ्यावी लागल्यास तीन महिन्यांसाठी आणखी रजा वाढवता येणार आहे. फक्त पुढील तीन महिन्यांची रजा बिनपगारी असेल, असे फ्लिपकार्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या नोकरीच्या निरंतरतेची आश्वासन देण्यात आले आहे. 

फ्लिपकार्टचा जी महिला कर्मचारी १२ महिन्यांपेक्षा जास्त वय असलेले बालक किंवा बालिका दत्तक घेईल त्यांना देखील तीन महिन्यांची पगारी रजा आणि चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या सोयीची वेळ कामासाठी दिली जाईल. शिवाय पुरूष कर्मचाऱ्यांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केव्हाही सहा आठवड्यांची रजा घेता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.