सात वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचाराचा तिने घेतला असा बदला

सात वर्षांपूर्वी एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार झाला होता. अखेर सात वर्षानंतर एफटीआयआयच्या फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान या विद्यार्थ्यीनीने अत्याचाराचा बदला घेतला. 

Updated: Dec 17, 2015, 11:47 AM IST
सात वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचाराचा तिने घेतला असा बदला title=

मुंबई : सात वर्षांपूर्वी एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार झाला होता. अखेर सात वर्षानंतर एफटीआयआयच्या फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान या विद्यार्थ्यीनीने अत्याचाराचा बदला घेतला. 

 एफटीआयआयची माजी विद्यार्थ्यीनी अद्वैता दासला तिच्या शॉर्टफिल्मसाठी बेस्ट एडिटिंगच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. योगायोग असा की अद्वैताला एफटीआयआयचे एडिटिंगमधील सह प्रोफेसर नीलांजन दत्ता यांनी सन्मानित केले. नीरांजन यांनी सात वर्षांपूर्वी लैंगिक शोषण केल्याचा आरोप अद्वैताने केलाय. 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अद्वैताने हातात माईक घेतला आणि नीलांजनचे कृत्य सर्वांसमोर उघड केले. अशा प्रकारे सर्वांसमक्ष तिने आपल्या अत्याचाराचा बदला घेतला.नीलांजन दत्ता एफटीआयआयमध्ये फिल्म एडिटिंगचे सहप्रोफेसर आहेत. त्यांनी २००९ मध्ये फिल्म भांग घरसाठी पर्यावरणावर राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.