मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

Updated: Dec 8, 2016, 04:34 PM IST
मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा title=

मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

खोटी कागदपत्र दाखवून 27 वाहनं असताना 42 वाहनांची बिलं मंजूर करून घेण्यात आल्याचंही समोर आलं आहे. एकाच गाडीनं एकाच वेळी एकापेक्षा अधिक फेऱ्या मारल्याच्या नोंदी दाखवून फेऱ्या आणि संख्या फूगवून आर्थिक लूट करण्यात आली आहे.