गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?

गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्याबाबत माहितीही शेअर होत आहे.

Updated: Jul 25, 2014, 04:06 PM IST
गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का? title=

मुंबई : गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्याबाबत माहितीही शेअर होत आहे..

आपण एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी करतो, गॅस आपल्या घरी येतो. आपण नियमित सिलिंडर घेतो. या सगळ्या व्यवहारात आपल्या नावाने एक विमा निघालेला आहे,याची आपल्याला कल्पना तरी असते का? 

स्वयंपाकाच्या गॅसचा आपल्या घरात अपघात, स्फोट वगैरे झाला तर आपण काय करतो ? आपण उपचारांचा, घरदुरूस्तीचा सगळा खर्च करतो. कारण, आपला विमा आहे, याचा आपल्याला पत्ताच नसतो?, अपघाताच्या वेळी, जर तो अपघात सदोष गॅस सिलिंडरमुळे किंवा यंत्रणेमुळे झाला असेल, तर विमा कंपनीकडुन ग्राहकाला ४० लाख रूपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते !!

नुकसान मोठ्या प्रमाणावर असेल तर भरपाईची रक्कम ५० लाखापर्यंतही जाऊ शकते. ही माहिती ना सरकार आपल्याला देत, ना गॅस कंपन्या. चुकून कघी असा प्रसंग ओढवलाच,
तर गॅस कंपनीकडे विमा मागायला विसरू नका! अशी माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, सर्वाना कळु दे. याकरिता शेअर करा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.