पुढारी घनश्याम दरवडे याचा युट्यूबवर धुमाकूळ

Updated: Jan 17, 2016, 08:54 PM IST
पुढारी घनश्याम दरवडे याचा युट्यूबवर धुमाकूळ title=

मुंबई : यूट्यूब या सोशल मीडिया व्हिडिओ साईटवर घनश्याम दरवडे या चिमुकल्या पॉलिटिकल गुरू धुमाकूळ घालतो आहे.  Popular right now in India या लिस्टमध्ये टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.

व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी 

घनश्याम दरोडे गुगल सर्चवरही टॉप : गुगलवर आता या क्षणी तुम्ही सर्च केले, तर सर्व भारतातील व्हिडिओपैकी घनश्याम दरोडे याचा झी २४ तास वरील पहिली लाइव्ह आणि Exclusive मुलाखत १९ व्या स्थानावर आहे. काल घनश्याम दरोडे याचा हा व्हिडिओ टॉप टेनमध्ये आठव्या स्थानावर होता.

सोशल मीडियावरही घनश्यामचाच बोलबाला : 

सोशल मीडीयावर आपल्या पॉलिटिकल ज्ञानाने सर्वांना चकीत करणारा घनश्याम दरवडे याला झी २४ तासचे नगरचे रिपोर्टर चौकर यांनी शोधून काढले. त्यानंतर औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी सुंदर मुलाखत घेतली. ही मुलाखत महाराष्ट्रासह जगभरात वा-यासारखी पसरली.

१४ जानेवारीपासून अवघ्या ३ दिवसात या मुलाखतीला २ लाख ३८ हजार ७९ हिट्स मिळाले आहेत.