परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2017, 12:59 PM IST
परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस title=

मुंबई : सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. 

यामुळे सरकारला अंधारात ठेवून हे परिपत्रक काढण्यात आलं की काय, या सगळ्या परिपत्रकाच्या प्रक्रियेवर सरकारचं नियंत्रण नव्हतं का, महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेनं टीका केल्यानंतर सरकारला हा साक्षात्कार झाला का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  दरम्यान, हे परिपत्रक रद्द करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाविषयी पक्षाची नाराजी बोलून दाखवली. या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिपत्रक रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली आहे.