अनधिकृत फटाका स्टॉलविषयी कडक कारवाई करण्याचे निर्देश

अनधिकृत फटाका स्टॉक विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्व पालिका, जिल्हा, स्थानिक पातळीवर समिती बनवून कामाला लागण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत. 

Updated: Oct 25, 2016, 06:36 PM IST
अनधिकृत फटाका स्टॉलविषयी कडक कारवाई करण्याचे निर्देश title=

मुंबई : अनधिकृत फटाका स्टॉक विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्व पालिका, जिल्हा, स्थानिक पातळीवर समिती बनवून कामाला लागण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत. 

पोलीस सहकार्य करत नसल्यास कोर्टाला कळवा असंही कोर्टानं म्हटलं आहे. यापूर्वी न्यायालयाने अनधिकृत फटाका स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कोर्टाने अनधिकृत फटाका स्टॉल विक्रीवर बंदी लावली आहे.