पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

Updated: Feb 5, 2014, 11:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.
पवई एरिया डेव्हलपमेंट योजनेंतर्गत अतिशय स्वस्त दरात गरिबांसाठी घरं देण्यासाठी, बनावट अर्ज तयार करून वाटप करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच अशी कुठलीही योजना नसल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे.
मात्र दुसरीकडे असं असेल तर सरकारनं अनेक लोकांचे अर्ज का स्वीकारले? तसंच ही योजना बनावट आहे, तर मग खुलासा तत्काळ का करण्यात आला नाही ? तसंच मुख्यमंत्री कार्यालय दोन दिवस गप्प का होते?.
गरिबांची थट्टा मांडणारे हे कार्यकर्ते कोण आहेत, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.