माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Updated: Aug 26, 2015, 04:51 PM IST
माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा  title=

मुंबई/गुवाहाटी: शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

आणखी वाचा - शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

शीना बोरा हत्येचा उलगडा झाल्यानंतर मिखाईल बोरानं सांगितलं, हो हे खरंय इंद्राणी शीना आणि मिखाईलची आई आहे. शीना आणि इंद्राणीमध्ये खूप वाद होते, असं मिखाईल यांनं सांगितलं.

मिखाईल गुवाहाटीमध्ये इंद्राणीच्या आई-वडीलांसोबत राहतो. मिखाईलनं आपल्याला या हत्येचं खरं कारण माहित असल्याचं म्हटलंय. जर आई इंद्राणीनं आपला गुन्हा कबुल केला नाही तर मी पोलिसांसमोर हत्येचं कारण पुराव्यांसह देईल, असं तो म्हणाला. 

आणखी वाचा - हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास

गेल्या वर्षी सप्टेंबरपासून आपल्याला इंद्राणीकडून कोणत्याही प्रकारणी आर्थिक मदत मिळालं नसल्याचंही मिखिलनं एएनआयसोबत बोलतांना सांगितलं. माझी बहीण खूप सोज्वळ होती, तिला न्याय मिळायलाच हवा. 

मिखाईलनं पुढे सांगितलं, "आम्ही दोघं भाऊ-बहीण आपल्या आजी-आजोबांसोबत गुवाहाटीला राहत होतो. शीना मुंबईला शिक्षणासाठी आली. त्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये गुवाहाटीला मित्राच्या लग्नासाठी आली होती. त्यानंतर माझी तिची भेट नाही. मी आईला नेहमी विचारायचो माझी मोठी बहीण कुठे आहे, तर तिला परदेशात नोकरी लागलीय, असं ती मला सांगायची."

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.