पाहा दुसऱ्या टप्प्यात या जि.प. आणि पंसच्या निवडणुका होणार

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात या निवडणुकीसाठी खालील तारखा महत्वाच्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 11, 2017, 07:02 PM IST
पाहा दुसऱ्या टप्प्यात या जि.प. आणि पंसच्या निवडणुका होणार title=

मुंबई :  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात या निवडणुकीसाठी खालील तारखा महत्वाच्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी असेल.
दुसऱ्या टप्प्यासाठी अर्जाची छाननी ७ फेब्रुवारी २०१७
न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे अपिलाची मुदत १० फेब्रुवारी २०१७
न्यायालयाच्या निकालाची संभाव्य अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०१७
अपील नसल्यास उमेदवारीच्या माघारीची तारीख १३ फेब्रुवारी  २०१७
अपील असल्यास उमेदवारीच्या माघारीची तारीख १५ फेब्रुवारी  २०१७
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख १५ फेब्रुवारी  २०१७
दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाची तारीख २१ फेब्रुवारी  २०१७
दुसऱ्या टप्प्यासाठीमतमोजणीती तारीख २३ फेब्रुवारी  २०१७