फोर्ब्सच्या यादीत रिलायन्स, एसबीआय अव्वल

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तीशाली 2 हजार कंपन्यांची नामावली फोर्ब्सने जाहीर केली आहेत. यात 54 कंपन्यांचा समावेश आहे.

Updated: May 9, 2014, 06:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तीशाली 2 हजार कंपन्यांची नामावली फोर्ब्सने जाहीर केली आहेत. यात 54 कंपन्यांचा समावेश आहे.
यातील सर्वात आघाडीच्या तीन कंपन्या चीनच्या आहेत. भारताच्या 54 कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने तिसरं स्थान पटकावलंय.
या ग्लोबल 2000 च्या यादीत इनकम, फायदा, बाजार मूल्याचं आकलन करून जगातील सर्वात शक्तिशाली कंपन्या निवडण्यात आल्या आहेत.
या यादीत सुरूवाच्या दहा कंपन्यांमध्ये चीनच्या पाच कंपन्या आहेत, तर अमेरिकेच्याही पाच कंपन्यांचा समावेश आहे. दुसरं स्थान जपानने राखलंय, जपानच्या 225 कंपन्यांना यात स्थान मिळालं आहे.
फोर्ब्सच्या यादीतील भारतीय कंपन्या आणि त्यांचा क्रमांक
ऑईल ऍण्ड नेचरल गॅस - 176 , आयसीआयसीआय बँक 304, टाटा मोटर्स 332, इंडियन ऑईल 416, एचडीएफसी 422, कोल इंडिया 428, लार्सन एंड ट्यूब्रो 500, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस 543, अॅक्सिस बँक 630, इन्फोसिस 727, बँक ऑफ़ बडौदा 801, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 803, आयटीसी 830, विप्रो 849, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स 873, गेल इंडिया 955 , टाटा स्टील 983 आणि पॉवर ग्रिड ऑफ़ इंडिया 1011 तसेच भारत पेट्रोलियम 1045, एचसीएल टेक्नोलॉजीज 1153, हिंदुस्तान पेट्रोलियम 1211, अडानी एंटरप्राइजेज 1233, कोटक महिंद्रा बैंक 1255, सन फार्मा इंडस्ट्रीज 1294, स्टील अथॉरिटी ऑफ़ इंडिया 1329, बजाज ऑटो 1499, हीरो मोटरकॉर्प 1912, जिंदल स्टील एंड पॉवर 1955, ग्रासिम इंडस्ट्रीज 1981 आणि जेडब्ल्यूएस स्टील 1990 यांचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.