'मॉर्निंग वॉकला जात चला'; 'सनातन'च्या वकिलाची सबनीसांना धमकी

सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेल्या संजीव पुनाळेकरांच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय. 

Updated: Jan 7, 2016, 09:35 AM IST
'मॉर्निंग वॉकला जात चला'; 'सनातन'च्या वकिलाची सबनीसांना धमकी   title=

मुंबई : सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेल्या संजीव पुनाळेकरांच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय. 

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना पुनाळेकरांनी 'मॉर्निंग वॉकला जात चला' असा धमकीवजा सल्ला ट्विटरवरून दिलाय. हा नेमका सल्ला आहे की धमकी अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

उल्लेखनीय म्हणजे, अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आणि पुरोगामी नेते गोविंद पानसरे या दोघांचीही मॉर्निंग वॉकला गेले असताना हत्या करण्यात आली होती... पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या समीर विष्णू गायकवाड याला अटक करण्यात आलीय. त्यामुळे, या हत्यांमागे सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं पुनाळेकरांचं हे ट्विट वादात सापडलंय. 

 

पुनाळेकरांनी असं ट्विट करण्यापेक्षा थेट खुली चर्चा करावी, असं आव्हान सबनीस यांनी दिलंय. संतांची ही भूमी अजून किती दाभोलकर आणि पानसरेंच्या रक्कानं माखली जाणार आहे असा सवालही त्यांनी केलाय. प्रतिक्रिया देताना मात्र सबनीसांना रडू कोसळलं.